लोहारा , दि . २३


      
 तालुक्यातील सास्तूर येथील श्री. शांतेश्वर दिव्यांग व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राचा डिप्लोमा कोर्स इन मेडीकल लॅब टेक्निशियन डी. एम.एल.टी व डिप्लोमा कोर्स इन कम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (डी. सी.सी.आय.टी)
या द्विवार्षीक अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई यांच्याकडून ऑक्टोंबर २०२१ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती.


 या परीक्षेस श्री. शांतेश्वर दिव्यांग व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रातून २५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत असे एकूण २२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे.
 डिप्लोमा कोर्स इन मेडिकल लॅब टेक्नीशियन (डी. एम.एल.टी) या व्यावसायिक अभ्यास क्रमाच्या परीक्षेत शुभांगी सितापूरे हिने ६६.२२% गुण मिळवत प्राशिक्षण केंद्रामधून प्रथम क्रमांक पटकावला. तर रोहिणी राठोड या विद्याथीनीने ६४.११% गुण मिळवून द्वितीय क्रमांक, तर तृतीय क्रमांक राठोड आश्विनी हिने ६२.३३.% , पटकावला आहे. तर डिप्लोमा कोर्स इन कम्प्युटर इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी (डी. सी.सी.आय.टी) या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत केंद्रातून ६५.७७% गुण घेवून संतोष खुरपे हा प्रथम, द्वितीय क्रमांक भिमाशंकर रूपनर ६३.७७%, तर संगम्मा कलशेट्टी हिने ६३.४४% गुण मिळवत केंद्रातून तृतीय आली आहे.
         

करोना काळातील विपरित परिस्थिती असतानाही या दिव्यांग विद्यार्थ्यांनी व्यावसायिक कौशल्य विकासतही नेत्रदिपक यश संपादित केले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्रातील निदेशक प्रा. बाबुराव ढेले, प्रा. कपिल रेड्डी, प्राचार्य बी.एम. बालवाड, डॉ. गौरी कुलकर्णी, डॉ. एम. आर. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, संस्थेच्या सचिव निर्मलाताई बदामे, वै.सा.का.भारत कांबळे, सहाय्यक सल्लागार सुभाष शिंदे, प्राचार्य बी. एम. बालवाड यांनी कौतुक केले आहे.
 
Top