तुळजापूर , दि . २४

तुळजापूर शहरा पासून जवळच असलेल्या हंगरगा शिवारमध्ये सुरु असलेल्या ऑर्केस्ट्राच्या नावावर सुरु असलेल्या डान्स बारचा परवाना रद्द करण्यात यावा, यासाठी तुळजापूर शहर महाविकास आघाडीने दि. ५ डिसें. रोजी  मुख्यमंत्री  यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले होते, त्या मागणीचा प्राधान्यने विचार करून  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , गृहमंत्री दिलीप वळसे पाटील , गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई  यांनी या ऑर्केस्ट्रा बारचा परवाना रद्द केला, त्याबद्दल त्यांचे तुळजापूर शहर वासिय व महाविकास आघाडीच्या वतीने  आभार मानले


यावेळी गोकुळ शिंदे, सुधीर कदम, उत्तमअमृतराव,अमर चोपदार, नगरसेवक राहुल खपले,संदीप गंगणे,गोरख पवार,गणेश नन्नवरे, शरद जगदाळे, महेश चोपदार,किरण घाट्शीळे, हेमंत कांबळे, मारुती नाईकवाडी, प्रकाश हुंडेकरी,अंगद माळी,  सुधीर जमादार.बेरू माने,आदी उपस्थित होते.
 
Top