रुईभर दि. २४
रुईभर ता. उस्मानाबाद येथील रहिवाशी राम भिमराव कोळगे वय 27 , याचे अल्पशा आजाराने गुरुवारी दि 23 रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास उपचार चालू असताना निधन झाले.
राम कोळगे यांच्या पोटात वेदना होत असल्याने त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतू उपचार चालू असताना त्यांची प्राणज्योत मालवली त्यांचा स्वभाव अतिशय चांगला मनमिळावू सगळ्या बरोबर मिळून मिसळून वागणारा होता त्यांच्या अकाली निधनाने रुईभर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्या पश्चात आई ,वडील, पत्नी ,आजोबा, बहिण,भाऊ,असा मोठा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या शेतात मोठया शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी नातेवाईक,आप्तेष्ट, गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.