मुरुम, दि. २४ :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात घेण्यात आलेल्या वैयक्तिक मैदानी भालाफेक स्पर्धेत श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील बी. ए. प्रथम वर्षात शिकणारी महिला खेळाडू कुमारी सोनाली पवार हीने या स्पर्धेत विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावून तिची भुवनेश्वर (ओरिसा) येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
या तिच्या यशाबद्दल महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, डॉ. जयश्री सोमवंशी, डॉ. रवि आळंगे, प्रा. गोपाळ कुलकर्णी आदींनी तिचे विशेष अभिनंदन केले. क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. भिलसिंग जाधव, प्रा. नारायण सोलंकर यांनी तिला मार्गदर्शन केले.