उस्मानाबाद , दि . २४ : राजगुरू साखरे
डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय उस्मानाबाद येथे दि.२४ रोजी राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रथमता डॉ. बापूजी साळुंखे यांचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.व्ही.जी.शिंदे , प्रमुख पाहुणे मुकुंद सस्ते यांची उपस्थिती होती. यावेळी सस्ते यांनी ग्राहकाचे अधिकार या विषयावर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व न्यायाधीश वसंत यादव यांनी विधी सेवा विभागात राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी रा.प.महाविद्यालयातील प्रा. नारायण सकटे यांची उपस्थिती होती,
यावेळी कार्यक्रमास विधी महाविद्यालयातील प्रा. नितीन कुंभार,प्रा. इक्बाल शाह, डॉ.गोलवाल डॉ. स्मिता कोल्हे मॅडम, प्रा.चंदनी घोगरे मॅडम, प्रा श्रीयश मैंदरकर, प्रा. बारकुल ,प्रा. अजित शिंदे, यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय आंबेकर, तर आभार प्रदर्शन कु. प्रियंका मक्खी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली तसेच या कार्यक्रमास विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.