जळकोट, दि.२४ : मेघराज किलजे

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्षपदी दत्तात्रय चुंगे यांची तर उपाध्यक्षपदी सदाशिव हासुरे यांची निवड करण्यात आली.


जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन कमिटी निवडीसाठी पालक सभा घेण्यात आली. या पालक सभेत शाळा व्यवस्थापन समितीचे गठण करून दोन वर्षासाठी नव्या पदाधिकाऱ्यांची  निवड करण्यात आली. 

 अध्यक्षपदी दत्तात्रय चुंगे यांची तर उपाध्यक्षपदी सदाशिव हासूरे यांची निवड करण्यात आली. सदस्यपदी हनुमंत सुरवसे, अजितसिंग खारे, शंकरराव कुंभार, दगडू सुरवसे, बाबाराव कुठार, सावित्रा साखरे, पूजा हासुरे, निर्मला पांढरे, धोंडाबाई कानडे, दिपाली कदम, महानंदा कोरे, अनिता हब्बू, ग्रामपंचायत सदस्य राजश्री कागे, शिक्षण तज्ञ किरण कदम, शिक्षक प्रतिनिधी विणा  विटकर, विद्यार्थी प्रतिनिधी कु. समीक्षा चव्हाण,कु. लक्ष्मी कुंभार , सदस्य सचिव परमेश्वर शिंगाडे यांची यावेळी निवड करण्यात आली. यावेळी नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.


या निवडीसाठी सरपंच अशोकराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र कदम तंटामुक्त समिती अध्यक्ष यशवंत कदम, महादेव सावंत, बसवराज कवठे, बबन मोरे, विजय यादगौडा, शंकर वाडीकर, सुधाकर कदम, हनुमंत कदम, लक्ष्‍मण पांचाळ , प्रकाश सगर आदिसह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top