जळकोट,दि.२४ : मेघराज किलजे
येथून जवळच असलेल्या रामतीर्थ ता . तुळजापूर येथे एसबीआय फाउंडेशन, मुंबई व दिलासा प्रतिष्ठान ,औरंगाबाद यांच्या ग्रामसेवा कार्यक्रमांतर्गत रामतीर्थ शिवारात राष्ट्रीय किसान दिन साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय किसान दिनानिमित्त शेतकऱ्यांना हरभरा व ज्वारी या पिकांच्या लागवड व तंत्रज्ञान यासंदर्भात माहिती देण्यात आली. शासनाच्या विविध योजनेसंदर्भात जळकोट येथील श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेचे अध्यक्ष मेघराज किलजे यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी एसबीआय फाउंडेशन व दिलासा प्रतिष्ठानचे कार्यक्रम समन्वयक गुरुदेव राठोड, शेतकरी राम चव्हाण, राजकुमार राठोड, अंबादास राठोड, धनु राठोड, गणपती राठोड, विश्वनाथ चव्हाण, हरिश्चंद्र राठोड, काशिनाथ राठोड, बाबू राठोड, देविदास पवार, भीमा आडे आदी शेतकरी उपस्थित होते.