उमरगा , दि . १६ :
गुंजोटी येथील श्रीकृष्ण महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने प्रा. डॉ. महादेव खोत यांना मानवविद्या शाखेतील हिंदी विषयात पीएच.डी. संशोधन मार्गदर्शक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादद्वारे मान्यता प्रदान केल्याबद्दल डॉ. खोत यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप कुलकर्णी यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १६) सत्कार करण्यात आला.
यावेळी हिंदी विभाग प्रमुख डॉ. बालाजी कोनाळे, प्रा. डॉ. जगदीश नन्नवरे, प्रा. प्रमोद चौधरी, डॉ. मिलिंद सुर्यवंशी, डॉ. रमेश मादळे, प्रा. रामदास कोळी, डॉ. सुनील पतंगे, डॉ. योगिराज विजापुरे, डॉ. भाऊसाहेब उगले, प्रा. राजाराम निगडे, डॉ. एम. जी. अंबुसे, प्रा. डॉ. दिगंबर चव्हाण, मोती जेटीथोर, नरसिंग जाधव आदी उपस्थित होते.