तुळजापूर , दि . १६
श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानातील लाडू प्रसाद , व व्हीआयपी स्पेशल पास म्हणून धर्मदर्शन पासमध्ये गैरप्रकार करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यास मंदिर सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक केल्याप्रकरणी भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष यांना लेखी तक्रार गुरुवार दि . १६ डिसेंबर रोजी करण्यात आली आहे.
भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष विजय भोसले यानी निवेदनात म्हटले आहे की, श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली व्यक्ती हा लाडू घोटाळातीळ मुख्य आरोपी असून त्याचबरोबर ,व्हीआयपी स्पेशल पास म्हणून देण्यात येणाऱ्या पासची अफरातफरी करणे,स्वतःचे आरोप वरीष्ठ अधिकाऱ्यांवर लादने आशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यास पदोन्नती देऊन एकप्रकारे भ्रष्टाचाराला पाठबळ दिल्याचे आरोप केले आहे. ,आशा अधिकाऱ्यामुळे मंदिर संस्थानची मोठी बदनामी होण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाऱ्याची मंदिर संस्थांनच्या अंतर्गत असणाऱ्या इतर आस्थापनेवर बदली करावी असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांची स्वाक्षरी आहे.