काटी , दि . १६
तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) येथे गुरुवार दि. 16 रोजी येथील एल.सी.सी. प्रिमिअर लीगच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आल्या. यावेळी प्रथम प्रगतशील द्राक्ष बागायतदार प्रकाश मगर, महेश पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते आई तुळजाभवानी देवीच्या प्रतिमेचे पूजन करून या क्रिकेट स्पर्धेचे उद्घघाटन करण्यात आले.
यावेळी या बहुचर्चित एल.सी.सी प्रीमिअर लीगमधील जय जवान जय किसान, राजे संभाजी इलेव्हन या दोन्ही संघांना रामदास मगर यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जर्शी किटचे वाटप करण्यात आले. यावेळी विशाल मगर, दिनेश माळी, मंगेश गाटे, महेश मगर, विजय मगर माळुंब्रा, गोंधळवाडी, सुरतगाव, पांगरधरवाडी, सांगवी (काटी) गावातील सर्व क्रिकेट प्रेमी नागरिक उपस्थित होते.