नळदुर्ग ,दि . १६ 

 भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते  धिमाजी घुगे यांची नळदुर्ग  शहराध्यक्षपदी निवड झाली आहे. घुगे हे  प्रमुख पदावर कार्यरत झाल्यामुळे येत्या काळात त्यांच्या हातून चांगले कार्य घडावे ,अशा शुभेच्छा शहर पत्रकार संघ आणि मैलारपूर कट्टा ग्रुपच्या सदस्यांनी दिल्या .

नळदुर्ग भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी धिमाजी घुगे यांची निवड झाली. तुळजापुर तालुक्याचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील, पंढरपुर-मंगळवेढाचे आमदार समाधान औताडे, औशाचे आमदार अभिमन्यु पवार, जिल्हाध्यक्ष नितिन काळे, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुशांत भूमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत  निवडीचे पत्र देण्यात आले . 


   बुधवार  दि. १५ डिसेंबर रोजी नळदुर्ग शहर पत्रकार संघ व मैलारपूर कट्टा ग्रुपच्या वतीने धिमाजी घुगे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  फेटा , शाल व पुष्पहार घालुन धिमाजी घुगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेकानी घुगे याना शुभेच्छा देवुन मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस श्रमिक पोतदार , कैलाशा घाडगे , जेष्ठ नागरिक रघुनाथ  नागणे ,  काँग्रेसचे माजी   नगरसेवक सुधीर हजारे,  पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे,  पञकार  विलास येडगे , तानाजी जाधव ,  शिवाजी नाईक,  भगवंत सुरवसे,  समाजिक कार्यकर्ते  संजय विठ्ठल जाधव, मारुती खारवे, मेडिकल असोसिएशनचे संजय दशरथ जाधव ,  अमर भाळे , उत्तम बणजगोळे ,  महेश जाधव आदीजण उपस्थित होते.



 
Top