वागदरी, दि . १६ एस.के.गायकवाड
देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आझादीका अमृत मोहत्सव संपुर्ण देशामध्ये साजरा करण्यात येत आहे . त्याचा एक भाग म्हणून भाई उद्धवराव पाटील प्रशाला, काकडे प्लॉट उस्मानाबाद येथे दि. 10 डिसेंबर रोजी आंतराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा करण्यात आला.
यानिमित्त मानवाधिकार या विषयी अँड.अजय वाघाळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते,कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सिद्धेश्वर बेलुरे , कवी वामनराव पांडागळे, शाळेच्या मुख्याध्यापिका नलावडे ,घेवारे, चौरे,उपस्थित होते. प्रारंभी शाळेतील दिव्यांग मुलांचा मानवाधिकार दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी वाघाळे म्हणाले की , संयुक्त राष्ट्र संघटना यांनी 1948 रोजी मानवा अधिकाराबद्दल घोषणा केली आणि त्या अनुषंगाने संपूर्ण जगामध्ये मानवाधिकार दिन 10 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. मानवाचे हक्क अधिकार या विषयी जनजागृती करण्याचा हा दिवस होय. कोणत्याही व्यक्तीला लिंगभेद, भाषा ,वर्ण ,धर्म,यावरती भेदभाव करता येणार नाही, सर्वांना समान संधी समान अधिकार, समान काम ,समान वेतन,या मानवअधिकारच्या माध्यमातून मिळालेले अधिकार आहेत ,याबद्दल त्यांनी प्रबोधन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायगावकर यांनी केले व आभार घेवारे यांनी मानले,कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते.