लोहगाव , दि .०६
तुळजापूर तालुक्यातील लोहगाव - नळदुर्ग
मार्गावरील रस्ता गेल्या अनेक वर्षापासून बांधकाम विभाग आणि जलसंपदा विभागाच्या वादात रखडलेल्या रस्ताचा वाद मिटल्याने अखेर कामास सुरूवात करण्यात आले आहे.
लोहगाव-नळदुर्ग मार्गावरील अलियाबाद ब्रिज ते रामतिर्थ देवस्थान पर्यंतचा अंदाजे ७०० मिटरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलसंपदा विभागाच्या वादात गेल्या अनेक वर्षापासून रखडला होता. त्यामुळे लोहगावसह परिसरातील नागरीकांना वहानधारकांना नाहकच ञास सहन करावा लागत होता.
या मार्गालगतच नळदुर्ग बॅरेज क्रमांक १(डॅम) झाल्याने हा रस्ता पाण्याखाली येवू लागल्याने संबंधित जलसंपदा विभागने बांधकाम विभागास पञ देवून ७०० मिटर रस्ता पाण्याखाली येत असल्याचे सांगून या रस्त्याची ऊंची वाढवून मजबूत सिंमेट काॅंक्रेट देण्याच्या अटीवर बांधकाम विभागाकडून रस्ता त्याब्यात घेतले. परंतू येथील डॅमचे काम पूर्ण होताच जलसंपदा विभागाच्या गुत्तेदारांकडून रस्ताची ऊंची भरिव करून वाढवण्यात आली. परंतू रस्ता सिमेंट काॅक्रेट न करता अर्धवट सोडण्यात आले.त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरून दुचाकी घसरून अपघातात वाढ झाली होती.
परिसरातील अनेक नागरीकांचे या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात होऊन दुखापत झाली आहे. तरीही याकडे संबंधित विभागाच्या अधिकार्यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांतून संताप व्यक्त होत होते. याची दखल घेवून लोहगाव ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून रस्ता कामास सुरूवात करण्याची मागणी केली होती.
कामास तात्काळ सुरूवात न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संबंधित विभागाकडे शेख यांनी निवेदनाद्वारे दिला होता.याचीच दखल घेवून दोन्ही विभागातील वाद मिटवून घेवून रखडलेल्या कामाच्या कामास सुरूवात करण्यात आले असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या रस्ता कामाची सूरूवात झाली असून रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे करून रस्त्यालगत असलेल्या डॅमच्या साईडने रेलींग किंवा संरक्षण भिंत बांधावी तसेच राष्ट्रीय महामार्गाहुन वळणा-या रस्त्यावर दिशा फलक लावावे,आणि राष्ट्रीय महामार्गावर पांढरे आढवे पट्टे मारून स्पिड कमी करण्याची निशानी करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख यांनी केली आहे.