तुळजापूर , दि .०६  

पुणे जिल्ह्यातील भोर येथे महाराष्ट्र मराठा सोयरिक गृपच्या वतीने तथा या संकल्पनेचे संस्थापक अध्यक्ष नागनाथ बागल (कुर्डुवाडी) उपाध्यक्ष मनोजकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी पुणे जिल्ह्यातील भोर येथे येथील अभिजित मंगल कार्यालयात सकाळी 9 ते 5 या कालावधीत विनाशुल्क राज्यस्तरीय मराठा  वधू-वरांचा थेट-भेट परिचय मेळावा संपन्न झाला. 


प्रारंभी या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन  प्रा. नागनाथ बागल, मनोजकुमार गोरे, रामदास सुरवसे, विश्वास निकम आदी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

     
या राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्यात सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, इंदापूर, कोल्हापूर, सांगली, पंढरपूर आदी विविध ठिकाणांहून 776 पुरुष तर 315 विवाहेच्छुक मुलींची नोंद झाली असली तरी प्रत्येक्ष 711 विवाहेच्छुक पुरुष तर फक्त 200 विवाहेच्छुक मुलींनी या मेळाव्यात आपला परिचय करून दिला. विवाहेच्छुक पुरुष मंडळींच्या उपस्थितीच्या पटीत मुलींची अतिशय नगण्य उपस्थिती ही विवाहेच्छुक मंडळींच्या  मनात धडकी भरवणारी होती. या मेळाव्यात पुरुष व मुलींच्या नोंदीसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले होते. तर आलेल्या वधू-वरांचा सविस्तर माहिती देऊन आयोजन समितीच्या वतीने थेट परिचय करून दिला जात होता. तसेच आयोजन समितीच्या वतीने आलेल्या वधू-वर व पालकांसाठी स्वतंत्र भोजन व्यवस्था करण्यात आली होती.
        

 हा मेळावा यशस्वी करण्यासाठी  मेळाव्याचे संस्थापक अध्यक्ष नागनाथ बागल (कुर्डुवाडी), उपाध्यक्ष मनोजकुमार गोरे,प्रा.रामदास सुरवसे, कुमकर, प्रा.सौ. गायकवाड, प्रा.महाडिक, प्रा.पाटील,शिंदे  थोपटे , गोरड ,संजय शिरवले, वाडकर , पवार , संजय खरमरे, राजिवडे ,  खाटपे, लेकावळे,अमर बुदगुडे, दिघे,गोळे अनंतराव सुर्यवंशी  आदी परिश्रम घेतले.




वधू-वर पालक मेळावा ही काळाची गरज झाली असून समाजाच्या हिताच्या दृष्टीने मुला मुलींची स्थळे जुळावी व‌ मुलींच्या पाल्यांना खर्च कमी यावा, अनेक व्यवसायिक वधू-वर सुचक मंडळाकडून पालकांची होणारी लूट थांबावी हि प्रामाणिक भावना ठेवून भोर येथील पहिला महाराष्ट्र  सोयरिक वधू-वर मेळावा घेतला असल्याचे सांगून मुलांच्या तुलनेत या मेळाव्यात मुलींची संख्या कमी दिसल्याने हि चिंतेचे बाब आहे. मुलीच्या ‘स्थळा’साठी खस्ता खाणारा आणि हुंड्यासह अनेक तडजोडी करणारा वधूपिता असे 10-15 वर्षांपूर्वीचे चित्र आता बदलले आहे. आता मुलगा पसंत नाही म्हणून सर्रास नकार देणा-या मुलींची संख्या वाढली आहे. घर, फ्लॅट, गाडीसह वेलसेटल्ड मुलांनाच मुली पसंत करीत असल्याचा ट्रेंड हळूहळू रुजत आहे.सध्या लग्नाच्या मार्केटमध्ये अनेक नवनवीन बदल होत आहेत. मुलींची संख्या कमी आहे. त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावल्याने त्यांच्या अपेक्षा वाढल्या  असल्याचे या मेळाव्यातून दिसून आले.
--संयोजक प्रा. नागनाथ बागल
                  कुर्डुवाडी
 
Top