नळदुर्ग , दि .८ :

  कोविड-१९ च्या पार्श्वभूमिवर सर्वत्र लॉकडाउन परिस्थिति होती,अशा वेळेस बँका व माइक्रो फायनांस कंपन्या कर्जदाराना वसूलीसाठी तगादा लावत होत्या, बळजबरी,दंडेलशाही,मुजोरवृत्तीने आरेरावीची भाषा करत महिला कडून बचत गटाची वसूली करत होते.  महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली होती. फायनांस कंपन्याच्या वसूली अधिकारी व मनसे पदाधिका-यांमध्ये वसूली थांबवन्यासाठी संघर्ष झाला होता, शेकडो महिलानी मनसेच्या पदाधिका-याकडे न्याय मागितला होता,व न्याय मिळवून देण्यासाठी व बँका व फायनांस कंपन्यानी, सक्तिने वसूली करू नये असे परीपत्रक  जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी काढले होते. 

त्याचे पालन करावे यासाठी मनसेने महिला बचत गटाचा नळदुर्ग येथे मोर्चा काढला होता.   पोलिस ठाणे नळदुर्ग यांनी मोर्चासाठी परवानगी नाकारली होती. तरीही मनसेने हा मोर्चा काढला होता. 



 मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव,  अविनाश साळुखे,लोहारा तालुकाध्यक्ष अतुल जाधव,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सचिव प्रमोद कुलकर्णी,यांच्यावर नळदुर्ग पोलिस ठाण्यात भादंवि कलम-१८८,२६९प्रमाणे गुन्हा दाखल केला होता,म्हणून प्र.वर्ग.न्या.दं. यांनी दि-११ डिसेंबर  रोजी कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.
 
Top