नळदुर्ग , दि . ८ :
राज्यभर चालु असलेल्या एस. टी . कर्मचाऱ्यांच्या संपास पाठिबा देवुन
एस. टी. महामंडळ हे राज्य शासनामध्ये विलनीकरन करावे या मागणीसाठी नळदुर्ग येथे बसस्थानका समोर शनिवार दि . ११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे नळदुर्ग पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक याना दि. ८ डिसेंबर रोजी शहर विकास आघाडीने दिला आहे.
नळदुर्ग शहर विकास आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर चालु असलेल्या एस.टी. कर्मच्याऱ्यांच्या संपास जाहिर पाठींबा.
एस.टी. महामंडळ राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे हे प्रमुख मागणीसाठी गेल्या 38 दिवसापासुन मुंबईच्या आझाद मैदानासह महाराष्ट्रातील प्रत्येक आगारामध्ये एस.टी. कर्मचारी कोणाच्याही दबावाला न घाबरता कसल्याही आमीषाला बळी न पडता भक्कमपणे आमचा हक्क द्या असे म्हणत संप करीत आहेत.
एस.टी. महामंडळ राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी आजपर्यंत 49 एस.टी. कर्मचाऱ्यांना आत्महत्या केले आहेत. तरीही ह्या सरकारला त्याची कसल्याही प्रकारची पर्वा नाही. उलट या मन मेलेल्या सरकारने कर्मचाऱ्यांना निलंबीत करणे, बडतर्फ करणे, मेस्मा लावण्याची धमकी देणे, बदल्या करणे असे विविध मार्गानी चालु असलेला संप मोडीत काढण्याचे धोरण अवलंबविले आहे. याचे नळदुर्ग शहर विकास आघाडीच्या वतीने तीव्र निषेध केल्याचे म्हटले आहे.
एस.टी महामंडळ हे राज्यशासनामध्ये विलीनीकरन केल्यास सर्वात जास्त एस.टी. मधून प्रवास करणाऱ्या जनतेचाही फायदा आहे. आणि म्हणून एस.टी. महामंडळ हे तात्काळ राज्य शासनामध्ये विलीनीकरन करावे यासाठी राज्यभर संप करीत असलेल्या एस.टी. कर्मचार्ऱ्यांच्या हितासाठी आणि जनतेच्या फायद्यासाठी सदर संपास दि. 11-12-2021 वार शनिवार रोजी सकाळी 11 वाजता बस स्टँन्ड समोरील हायवे रस्त्यावर रास्ता रोको करुन पाठींबा जाहिर करीत आहोत. त्याचप्रमाणे रास्ता रोको करुन या जनआंदोलनाच्या माध्यमातुन सरकारला आमच्या भावना कळवित आहोत. तरी चावडी चौकातुन वाद्यासह बस स्टँड समोरील हायवेवर रास्ता रोको करण्यात येणार आहे.
या निवेदनावर नळदुर्ग शहर विकास आघाडीचे अध्यक्ष संजय बताले , उपाध्यक्ष अजरोद्दीन इनामदार , सरचिटणीस किशोर घोडके , मुजीब मौजन , कार्याध्यक्ष डुकरे विजयकुमार आदीच्या सह्या आहेत.