नळदुर्ग , दि . ८ :
नळदुर्ग शहर व परिसरात नामांकित मद्याच्या कंपनीचे लेबल लावुन केमिकलयुक्त बनावट दारुची विक्री खुलेआम सुरु असून या बनावट दारुमुळे अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बनावट दारुचे सेवन केल्याने काहीजण आजारी पडत असल्याची चर्चा मद्यप्रेमी नागरिकात होत आहे. याप्रकरणी प्रशासनाने , संबधित विभागाने तात्काळ लक्ष देत कारवाई करावी अशी नागरिकातुन मागणी होत आहे.
नामांकित कंपनीच्या दारुच्या रंगाच्या बरोबरीने ही केमीकल मिश्रीत दारु विक्री करण्याची टोळी शहर व परिसरात सक्रीय झाली असून पोलिस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने या टोळीवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. विशेष या दारुच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असून दारुच्या बाटलीवर असलेल्या किमतीमध्ये मोठा फरक दिसून येत आहे. त्यामुळे ही बनावट दारु येते कुठून किंवा कुठे बनविले जाते याचा शोध घेणे गरजेचे झाले आहे.
नळदुर्ग शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात बनावट दारु विक्री होत आहे. यामध्ये मॅकडॉल नं. वन व्हीस्की, रम, आय. बी., आर एस आदी बनावट दारु ओरीजनल किमतीच्या बरोबरीने विक्री केली जात आहे. मात्र या दारुच्या रंगामध्ये थोडा फार फरक जाणवत असल्याने या दारुचे सेवन करताना याच्या चवीवरुन व रंगावरून या बनावट दारुची ओळख होत आहे. अनेक पिणाऱ्या नागरीकांनी सांगितले की, रंगा मध्ये थोडाफार फरक असणारी अशी दारु चवी मध्ये ही फरक आहे, आणि या दारुमध्ये मोठ्या प्रमाणात केमीकल मिश्रीत केले जात आहे.
त्यामुळे ही दारु नागरीकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे. त्यामुळे ही बनावट दारु तयार करणारी टोळी आता गजाआड होणे गरजेचे आहे. कारण या पूढे भविष्यात अशी दारु मोठ्या प्रमाणात विकली गेली तर अनेक नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवनार आहे. परिणामी अनेकांच जीवीतास धोका होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाने व राज्य उत्पादन शुल्क विभागाने या बनावट होत असलेली विक्री करणारी टोळी तात्काळ गजाआड करावी, कारण या बनावट दारुमुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. शिवाय अशा दारुची किमत ही ओरीजनल दारुच्या किमती बरोबर आहे. मात्र या दारुच्या किमतीच्या लेबलवर किमत जी आहे ती ओरीजनल दारुच्या किमतीच्या तुलनेत फार कमी आहे परंतु अशा बनावट व केमीकल दारु पिणाऱ्या नागरीकांच्या पोटात गेल्याने मोठ्या आजाराची लागण होण्याची शक्यता आहे. अशीच एक आय बी कंपनीच्या दारुच्या ओरीजनल व बनावट दारुच्या बाटल्या वरील किमत पाहता बनावट दारुच्या बाटलीवर केवळ 52 रुपये किमत आहे. तर ओरीजनल दारुच्या बाटलीवर जवळपास दीडशे ते एकशे साठ रुपये किमत आसल्याचे पहावयास मिळाले आहे. त्यामुळे अशा घातक दारुपासून आता नागरीकांनी ही दुर राहीले पाहीजे.
पोलिस प्रशासनानेही या बनावट दारु विक्रेत्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र पोलिस प्रशासन या बाबीकडे गांभीर्याने दखल घेत नसल्याचेच दिसून येत आहे. म्हणून अशा बनावट दारूच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. शहर व परिसरातील ग्रामीण भागात अशी दारु खुलेआम विक्री केली जात आहे.
या गंभीर प्रकरणी उत्पादन शुल्क विभाग , पोलिस प्रशासन , अन्न भेसळ प्रशासन लक्ष देवुन बेकायदेशीर धंदे करणा-यांचे मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे.