तुळजापूर, दि. ८

श्री.तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात टीपीओ विभागामार्फत सर्व अंतिम वर्षातील वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी क्यु-स्पाइडर प्रा.लि., या नामांकित कंपनी मार्फत ऑनलाईन कॅम्पस ड्राईव्ह घेण्यात आला, त्यामध्ये या महाविद्यालयाच्या एकुण 120 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला व त्यांची ऑनलाईन अॅप्टिटयूड टेस्ट व ग्रुप डिस्कशन घेण्यात आले,


 त्यातुन 19 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तीन महिन्याचे कंपनी पुरक फुकट ट्रेनिंग देवून त्यांची नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत निवड करुन घेतात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये संगणक विभागाचे अंजित पाटील, ऐश्वर्या पंके, रेश्मा सुतार, साक्षी शेळके, अश्विनी दळवी, प्राजक्ता धुमाळ, प्रतिभा शिंदे, सोनाली करपे, वृषाली गाटे, उज्वला मोरे यांची निवड झाली. स्थापत्य विभागातुन तफजूल शेख, नागेश बडूरे, प्रतिक पाटील, ज्योती शितोळे, सायली घाडगे यांची निवड झाली. 

अणुवैजिक व दुरसंचार विभागातुन सानिया बागवान, निकीता डांगे, रेश्मा व्हटकर यांची निवड झाली, तर यांत्रिकी विभागातुन स्लेषा खोपडे या विद्यार्थीनीची निवड झाली.

या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.डी. पेरगाड, उपप्राचार्य प्रा.आर.जी. मुदकण्णा, टीपीओ प्रा.छाया घाडगे, टीपीओ सेल प्रमुख प्रा.पी.ए. हंगरगेकर, संगणक विभाग प्रमुख प्रा.आर.एच. आडेकर, अणवैजिक व दुरसंचार विभाग प्रमुख डॉ.डी.डी. खुमणे व यांत्रिकी विभाग प्रमुख प्रा.व्ही.बी. पानसरे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकत्तेर कर्मचारी यांनी या निवडीबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.



या यशाबद्दल जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री.तुळजाभवानी मंदीर संस्थान, कौस्तुभ दिवेगांवकर, उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद तथा विश्वस्त डॉ.योगेश खरमाटे, तहसिलदार तथा व्यवस्थापक प्रशासन श्री.तुळजाभवानी मंदीर संस्थान श्रीमती योगिता कोल्हे, तुळजापूरचे आमदार तथा महाविद्यालयाचे विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष तथा विश्वस्त सचिन रोचकरी, तुळजापूर तहसिलदार तथा विश्वस्त सौदागर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
 
Top