तुळजापूर , दि .८  

त्र्यंबकेश्वर येथील गुरुकुलचे पीठाधीश तथा स्वामी समर्थ केंद्राचे परमपूज्य गुरुमाउली अण्णासाहेब मोरे महाराज हे तुळजापूर येथे आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आले असता त्यांचे स्वामी समर्थ केंद्राचे सेवेकरी यांच्या वतीने येथील हेलीपॅडवर माजी सभापती तथा भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, खासदार ओमराजे निंबाळकर यांचे बंधू डॉ. जयराजे राजेनिंबाळकर यांनी त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून जोरदार स्वागत करुन शुभआशिर्वाद घेतले.

      
 यावेळी माजी सभापती तथा भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष  बोबडे, डॉ. जयराजे राजेनिंबाळकर, यांच्यासह उस्मानाबाद,तुळजापूर व सोलापुर येथील स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी उपस्थित होते.
 
Top