मुरूम, दि . ८ :
येथील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मुरुम ते आष्टाकासार रोड लगतच्या चार नाल्यावर बंधारा टाकण्याचे काम बुधवारी दि. ८ रोजी पूर्ण करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवकांनी पुढाकार घेऊन सदर काम पूर्ण केले. महाविद्यालयाचे प्राचार्य इंगोले डी. टी., कार्यक्रमाधिकारी माने के. बी. कार्यक्रमाधिकारी उपासे , प्रा. गोविंद इंगोले, इंगळे , रोहन हराळकर, एस. बी. राठोड, प्रा. श्रीमती विजया बेलकेरी आदींची उपस्थिती होती.
देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त पाणी आडवा, पाणी जिरवा ! ही जलसंधारणाची कामे महाविद्यालयातर्फे करण्यात आली.