किलज , दि .८
तुळजापूर तालुक्यातील वडगाव देव येथील खंडोबा यात्रेला दि.१ डिसेंबर तर किलज येथील श्री.खंडोबा यात्रेला दि.६ डिसेंबर पासून प्रारंभ झाला आहे.दरम्यान या यात्रेनिमित्त यात्रा कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यात्रा कमिटीच्या माध्यमातून मंदिर परिसरात स्वछता करण्यात आली आहे.तसेच वडगाव देव येथील मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.आणि किलज येथे विजय मंडप सर्व्हिस यांच्या वतीने येथील श्री.खंडोबा मंदिरावर यात्रेनिमित्त आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.या आकर्षक विद्युत रोषणाईने सर्वाना आकर्षित केले जात आहे.