अणदूर , दि . २८ : श्रीकांत अणदूरकर 

तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी ग्रामपंचायतीच्या वतीने थकीत व चालू ग्रामपंचायत कर  शंभर टक्के  भरणाऱ्या कुटुंबियांना आता यापुढे मोफत दळण दळून दिले जाणार असुन  पिठाची गिरणी  यंत्राचे पूजन,जेष्ठ समाजसेवक डॉ सिद्रामपा खजुरे यांच्या हस्ते, ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे .


 आता शासनाच्या आदर्श शाळा निर्मिती बरोबरच खुदावाडी ग्रामपंचायत व गाव पुढाऱ्याने शक्कल लढवून एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  ग्रामपंचायतीच्या वतीने गावात दोन पिठाची गिरणी यंत्र आणले आहेत. गिरणी यंत्र बसवण्याच्या कामाला लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे . शभंरटक्के ग्रामपंचायत कर भरणा करणा-या या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. आता यापुढे मोफत दळण दळून दिले जाणार आहे . यावर संपूर्ण नियंत्रण ग्रामपंचायतीचे राहणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीचे सरपंच शरद नरवडे यांनी  बोलताना दिली .


सरपंच नरवडे यानी पुढे बोलताना  म्हणाले की , ग्रामपंचायतची थकीत व चालू बाकी शंभर टक्के    भरणाऱ्या  कुटुंबांना , कुटुंबातील सदस्याच्या संख्येनुसार प्रत्येक महिन्याला सरासरी किती पिठ लागते, याबाबत उपसरपंच व  सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काही नियम अटी लागू करण्यात येणार असल्याचे  सांगितले.

या नवीन यंत्राचे पुजन समाजसेवक  डॉ . सिद्रामप्पा खजुरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच शरद नरवडे, ग्रामपंचायत  सदस्य शेकाप्पा  सालगे, यादव जाधव, वसंत  सालगे, आणू बोगरगे, मनोहर अहंकारी , आशा कार्यकर्ती मंगलताई कापसे, रघुनाथ सांगवे, सहदेव जवळगे,  दिलीप सालेगावे, श्रीधर नरवडे, आपु टेलर, शाम बोगरगे ,नागनाथ खजुरे ,संभाजी कापसे ,पांडुरंग व्हलदुरे आदीसह  नागरिक युवक महिला उपस्थित होते . 


हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी उस्मानाबाद जिल्ह्यातील हि पहिली ग्रामपंचायत असल्याने या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे .
 
Top