वागदरी , दि . २७


रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे सामाजिक न्याय राज्य मंत्री  ना. रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त  नळदुर्ग येथील आपलं घर  येथिल अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व फळाचे वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.  


   रिपाइं (आठवले) नळदुर्ग शहर शाखेच्या वतीने   रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त येथील राष्ट्र सेवादल संचलित आपलं घर बालकाश्रमातील अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व फळांचे वाटप करण्यात आले. तसेच जवाहर महाविद्यालय अणदूर येथे संस्कृत भाषा विषयाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ.सत्येंद्र राऊत याना संस्कृत भाषेतील डिलीट पदवी मिळाल्या बद्दल त्यांचा याप्रसंगी  सत्कार करण्यात आला.
 


 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पँथर नेते प्रमोद कांबळे  तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते मारुती बनसोडे , भैरवनाथ कानडे हे उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांनी केले. तर  सूत्रसंचालन रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड यांनी केले. यावेळी रिपाइं युवक आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष अरूण लोखंडे, नळदुर्ग शहराध्यक्ष दत्ता बनसोडे, शहर कार्याध्यक्ष महादेव कांबळे, येडोळा शाखा अध्यक्ष देवानंद लोंढे, राष्ट्र सेवा दलाचे गुंडू पवार आदीसह विद्यार्थी  उपस्थिती होते.
 
Top