तुळजापूर , दि . २७  

देशाचे पंतप्रधान,माननीय श्री नरेंद्र मोदीजी, मा,जे.पी,नड्डा, देवेंद्र फडणवीस, यांच्या नेतृत्वाखाली, मा,चंद्रकांत दादा पाटील यांच्या सहमतीने, तुळजापूर येथील गुलचंद व्यवहारे यांची भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश,जैन प्रकोष्ठच्या मराठवाडा विभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.


गुलचंद व्यवहारे यांना देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात भारतीय जनता पार्टीच्या ध्येय व धोरणाच्या प्रभावीपणे प्रचार व प्रसार करून पक्ष बळकट व संघटन मजबूत करण्याकरिता अहोरात्र प्रयत्न कराल व पक्षाच्या संविधानाचे पालन करावे असा आदेश देण्यात आला आहे.

गुलचंद व्यवहारे यांच्या या निवडीबद्दल आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणा जगजीतसिंह पाटील,आमदार अभिमन्यू पवार,भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य सुधीर पाटील, ॲड. अनिल काळे, ॲड.व्यंकटराव गुंड, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, फेडरेशनचे चेअरमन नारायण ननवरे,नगरसेवक सचिन पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.
 
Top