सोलापूर ,दि . २७: 

अक्कलकोट तालुक्यातील  वागदरी परमेश्वर देवस्थान ट्रस्टचे प्रसिद्धी प्रमुख,मुक्तपत्रकार,स्तंभलेखक, साहित्यिक धोंडपा नंदे यांना संत दत्ताबपू साहित्य नगरी ,संत रविदास सांस्कृतिक सभागृह हदगाव जिल्हा नांदेड येथे ६ वे अखिल भारतीय गुरू रविदास साहित्य संमेलनात पत्रकारिता  क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन "डॉ .बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता" आदर्श पत्रकार पुरस्कार संमेलनाध्यक्ष  साहित्यिक सुभाष सोनवणे यांच्या हास्ते प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आले.
    

 यावेळी अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषद संस्थापक अध्यक्ष संमेलन आयोजक चंद्रप्रकाश देगलूरकर , प्रमुख पाहुणे डी एन सुर्यवंशी ,एच.पी.कांबळे ' प्राचार्य  विकास कदम, जेष्ठ कवी .मधु बावलकर,राजेंद्र धने,सुरेश गंगासागरे, माणिकराव गिरगावकर,कैलास राऊत आदी  उपस्थित होते.
       

गेल्या २२ वर्षापासून धोंडपा नंदे  वृत्तपत्र लेखन क्षेत्रात कार्यरत असून विशिष्ट वृत्तपत्रांतून विविध विषयावर सातत्याने लेखन करत आहेत. आतापर्यत जवळजवळ सहा हजार लेख प्रसिद्ध झाल्याचे त्यानी सांगितले .बदलत्या काळाप्रमाणे सोशल मिडीयावर विविध विषयावर लेखन करत असतात, ते फेसबुक वरील अक्कलकोट घडामोडी ग्रुपचे प्रमुख असून तालुक्याच्या विविध प्रश्नावर वाचा फोडण्याचा काम करत आहेत.आतापर्यंत विविध सामाजिक संघटना व संस्थाकडून त्याना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.
      

 ६ वे अखिल भारतीय गुरू रविदास साहित्य संमेलनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता आदर्श पत्रकार"पुरस्कार मिळाल्या बदल वागदरीसह अक्कलकोट तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्याच अभिनंदन केले आहे.
 
Top