वागदरी , दि . १६ : एस.के.गायकवाड

उस्मानाबाद जिल्ह्यातील आष्टा (कासार) ता.लोहारा येथील मुळ रहीवाशी असलेले व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले आंबेडकरी चळवळीतील  साहित्यिक डॉ. डी.टी.गायकवाड यांच्या पुस्तकांचे प्रकाशन माजी आमदार अँड.जयदेव गायकवाड यांच्या हस्ते एका  कार्यक्रमात पुणे येथे करण्यात आले.

  
सत्यशील  सामाजिक संस्था पुणे (वागदरी) व संजीवनी फाउंडेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मिलिंद बुद्ध विहार रामटेकडी हडपसर पुणे येथे पुस्तक प्रकाशनव व चळवळीतील कार्यकर्त्यांचा सत्कार संमारंभाचे आयोजन  करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले  माजी आमदार जयदेव गायकवाड  यांच्या हस्ते डॉ. डी.टी.गायकवाड यांच्या "विवेकवादी धम्म चळवळ" व "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर और किसान आंदोलन' या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच नवोदित  साहित्यिक मनोहर कांबळे यांच्या  "माझी भारत भ्रमंती" या ग्रंथाचे प्रकाशन ही  करण्यात आले.


 यावेळी अनेकांचा  सन्मान करण्यात आला तर   पुण्यनगरीचे पत्रकार वसंत वाघमारे यांची पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल त्यांचा  सत्कार करण्यात आला.


   
या प्रसंगी  मार्गदर्शन करताना जयदेव गायकवाड यानी डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा आढावा घेतला. तर डॉ  गायकवाड यांनी पुस्तक  वाचनाची कास धरायला हवी, कारण पुस्तके माणसाला दृष्टी देतात. आपल्या ज्ञानात भर पडते तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्यांनी पुस्तक वाचण्याची आवड निर्माण करावी असे आवहान केले. 


   
या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी संस्थेचे वामन धाडवे, डॉ. किशोर शहाणे, प्रवीण वाघमारे, राजेंद्र वाघमारे,अरुण आल्हाट, हरीदास वाघमारे ,गौतम वाघमारे,  विशाल कसबे आदीसह  कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
 
Top