लोहगाव , दि . २० : 


तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथिल  संभाजीनगर  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय समितीच्या अध्यक्षपदी शकिल मुलाणी तर उपाध्यक्षपदी सरिता कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तर सचिव मुख्याध्यापक  धनराज रेणुके, सदस्य  विजय पिसे, मारूती भोगे, तुकाराम कुंभार,   महेश भोसले, राम बंडगर, निळकंट माटे,
विश्वनाथ दरेकर, सिद्धेश्वर मडोळे, जयश्री भोगे ,मनीषा कांबळे, आरीफ मुल्ला, अनीस बागवान, वैजयंता चौगुले, प्रेमनाथ कदम, अनिता अंगुले, अनुसया बेडगे आदीची  निवड करण्यात आली आहे.



निवडीनंतर सर्व  नुतन  सदस्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सभापती रेणुका भिवाजी इंगोले, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच अशोकराव पाटिल, मनसे जिल्हाध्यक्ष सदस्य प्रशांत नवगीरे, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र कदम, महेश कदम,कुष्णात मोरे,शोभा अंगुले,  यांच्यासह शिकक्षक पालक व ग्रामस्थ मोठ्यासंख्याने उपस्थित होते,
 
Top