उमरगा ,दि .२०
महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी बंदी असलेल्या विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतुक केली जात असल्याच्या गोपनीय माहिती वरुन उमरगा तालुक्यातील दाळींब व जकेकूर शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून तब्बल साडे आठ लाखाची विदेशी मद्य जप्त केला. तर पाच जणांनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप धर्मा कटबू (रा. आलूर), विकास इंद्रजित गायकवाड (रा.नारंगवाडी), रवींद्र दयानंद कांबळे (रा.जकेकुर), सिद्धराम वसंत मुळे (रा.दाळींब), कुमार नीळकंठ शेवरे (रा.दाळींब) या पाच जणाविरुध्द गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
या धाडीत सुमारे ८ लाख ४८ हजार ४९० रूपयांचे विदेशी मद्य जप्त केल असून याप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी दिलेली माहिती अशी की उमरगा तालुक्यातील जकेकुर व दाळिंब शिवारात विदेशी मद्याची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पथकाने रविवारी सदर ठिकाणी अचानक धाडी मारल्या. त्यांच्या ताब्यातूनगोवा राज्यासाठी निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीला प्रतिबंधित विदेशी मद्य, प्लास्टिकची जिवंत बुचे, रिकाम्या बाटल्या तसेच दोन चारचाकी व दोन दुचाकी वाहने मिळून आले असे सुमारे ८ लाख ४८ हजार ४९० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जे. बी.चव्हाण, सचिन भवड, सी. डी. कुंठे, सुखदेव सीद, पी. बी. गोणारकर, एस. व्ही. वाघमारे यांच्यासह पथकाने केली आहे.