तुळजापूरः दि. २०
पत्रकार यांच्या विविध प्रश्नाबाबत सोमवार दि.२० रोजी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री याना तुळजापूर तहसीलदार मार्फत विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या नमुद करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील काळी दौलत खान येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या जिल्ह्यातील पुसद येथील वाडसी पत्रकार संदेश कानू व सय्यद फैजान यांच्यावर तीस ते चाळीस गाव गुंडानी प्राणघातक हल्ला करुन पत्रकार जवळील वृत्तांकन करण्यासाठी अंदाजे ८० हजार रुपयांचे साहित्य लुटून नेले, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेवर हा हल्ला असून याबाबत संबंधितावर तात्काळ कारवाई करावी, पिडीत पत्रकारांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, शैक्षणिक प्रवेश मध्ये पत्रकारांच्या कुटुंबाला प्राधान्य मिळावे, या व इतर २२ मागण्यांचा समावेश आहे.निवेदनावर राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव संजय गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष राहुल कोळी, तुळजापूर तालुकाध्यक्ष चाँदसाहेब शेख, उपाध्यक्ष प्रतीक भोसले, तालुका कार्यकारणी सदस्य प्रा.प्रताप मोरे, रुपेश डोलारे, बालाजी गायकवाड, मकबुल तांबोळी, प्रविण राठोड आदीच्या सह्या आहेत.
राज्यातील पत्रकार बांधव प्रथम असुरक्षित आहेत,लोकशाहीचा असलेला चौथा स्तंभ ह्या भुमिकेतून वार्तांकन करणाऱ्या पत्रकार बांधव यांचेवर सतत होणारे हल्ले रोखावेत,त्याचबरोबर इतरही अनेक प्रश्न शासनाच्या निदर्शनास आनून देने बाबत राज्यात संयुक्त निवेदन मोहीम राबविण्यात आली.