काटी , दि . २०
तिरट नावाचा जुगार खेळणा-या सहा जणांना पोलिसानी रंगेहाथ पकडुन जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली. ही घटना तामलवाडी पोलिस ठाण्याच्या हाद्दीत रविवारी घडली.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले, पोलीस अंमलदार शिवाजी सिरसट, आकाश सुरनर यांच्या पथकाने रविवार दि. 19 रोजी सायं काळी 6:30 वाजनेच्या दरम्यान खडकी तांडा शिवारातील एका दर्गा समोरील रोडलगत छापा टाकला.
यामध्ये सोलापूर येथील नटराज पाटोळे , तौफीक शेख , ईरफान शेख , जुलफीकार कुरेशी , भारत गायकवाड , सादीम बागवान हे सहाजण बेकायदा, बिगर परवाना तिरट नावाचा जुगार पैसे वापरुन खेळत असताना मिळुन आले. त्यांच्या कडून जुगार साहित्यासह 3,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तामलवाडी पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राठोड करीत आहेत.