तुळजापूर , दि . २१

मोबाईल फोनच्या अती वापराने लहान मुले तसेच युवकांमध्ये मानसिक आजार वाढिस लागत असून मुले हिंस्र बनत आहेत.  यासाठी शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना मोबाईल ऐवजी  कॉम्प्युटरची गोडी निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. आनंद मुळे यांनी केले.

    
अष्टभुजा कॉम्प्युस्किल्स च्या  शालेय विद्यार्थ्यांसाठी चा विशेष कॉम्प्युटर कोर्स च्या प्रमाणपत्र वितरण प्रसंगी डाॅ. मुळे बोलत होते. यावेळी अष्टभुजा कॉम्प्युस्किल्स च्या संचालिका सोनाली मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

     
 शालेय जीवनातच मुलांना कॉम्प्युटरची गोडी निर्माण झाली तर मुलांच्या कल्पना शक्तीमध्ये नक्की वाढ होते व मोबाईलचा वापर आपोआप कमी होतो. या संकल्पनेतून अष्टभुजा कॉम्प्युस्किल्स च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी चा विशेष कॉम्प्युटर कोर्स तयार केला असल्या ची माहिती कॉम्प्युस्किल्स च्या संचालिका सोनाली मुळे यांनी प्रास्ताविकात दिली. 

दोन महिन्याचा विशेष कॉम्प्युटर कोर्स यशस्वी पणे पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.  या प्रसंगी विद्यार्थ्यी, पालकांची उपस्थिती होती. 


●  प्रमाणपत्राचे  वितरण ●

 हर्षवर्धन गवळी, प्रथमेश अमृतराव, शाकंभरी मगर, शिवम हुंडेकर, श्रावणी पाटील, वेदिका पाटील, प्रज्ञा गवळी, स्वरा मुळे, आरुषी पवार व जान्हवी पाटील 

 
Top