उस्मानाबाद , दि . २१ : 

जिल्ह्यातील स्त्री रुग्णालय उस्मानाबाद येथील राणी किशोर गुजर यांच्या नवजात बाळाला जन्मतः श्वास घेण्यास त्रास होत होता, या वेळी राणी गुजर यांना काय करावे हे काहीच कळत नव्हते, त्यांना डॉक्टरांनी जिल्हा स्त्री रुग्णालय उस्मानाबाद येथून उपचार करण्यासाठी सोलापूर येथे जाण्यास सांगितले. परंतु सदर बाळाला सोलापूर पर्यंत घेऊन जाणे शक्य नव्हते ते धोक्याचे असल्याकारणाने काय करावे असा प्रश्न बाळाच्या नातेवाईकांसमोर होता. 


तसेच बाळाचे आई वडील यांची हलाखीची परिस्थिती असल्याकारणाने खाजगी रुग्णालयात पैसे भरून उपचार करणे त्यांच्या परिस्थितीच्या बाहेर होते. त्याच वेळेस महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. भुतेकर यांच्याशी रुग्णांच्या नातेवाईकानी संपर्क साधला असता त्यांनी वात्सल्य हॉस्पिटल या रुग्णालयात जाण्यास सांगितले परंतु तेथे अगोदरच दोन नवजात बाळ व्हेंटिलेटर मशीन वर असल्याकारणाने  बेड उपलब्ध नसताना डॉ.मुकुंद माने व डॉ.नितीन भोसले यांनी  बाळासाठी व्हेंटिलेटर मशीन बेड उपलब्ध करून सदर बाळाला महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार देऊन जीवनदान दिले. याबद्दल त्यांचे नातेवाईकांनी आभार व्यक्त केले. 


कृतज्ञता म्हणून बाळाच्या नातेवाईकांनी डॉ. नितीन भोसले व वात्सल्य हॉस्पिटल कर्मचारी यांचा शाल व श्री.फळ देऊन यथोचित सत्कार केला.
 
Top