तुळजापूर , दि . २१ :
दहिवडी ता . तुळजापूर येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांच्या श्रमदानातुन "पाणी अडवा , पाणी जिरवा" या अंतर्गत दहिवडी गावच्या शिवारात वनराई बंधारा बांधण्यात आला.
तुळजापूर तालुक्यातील दहिवडी येथे जि. प. प्राथमिक शाळा असुन याठिकाणी इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत वर्ग आहेत. या गावाच्या शिवारात मोठे तलाव असुन त्यातुन मोठया प्रमाणावर पाणी पाझरुन वाया जात आसल्याचे पाहुन शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांच्या सहभागाने बंधारा बांधण्यात आला.
तलवातुन पाणी पाझरुन जात असल्याने ते पाणी आडविले. या कामात पाच शिक्षकसह ३० विद्यार्थी सहभागी झाले होते. पोत्यामध्ये वाळु , खडी भरुन व दगड घालुन पाणी आडविले आहे.
सोमवार दि . २० डिसेंबर रोजी बंधा-याचे काम पुर्ण झालेआहे.
यासाठी मुख्याध्यापक पी . एस. सोनवणे , सहशिक्षिका श्रीमती तुपेरे भारती, श्रीमती साठे सविता, श्रीमती कदम अनिषा, श्रीमती सय्यद समीना यांनी सहकार्य केले.