जळकोट,दि.२१ : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाचे विमा प्रतिनिधी नितीन माळी यांना विमा व्यवसायातील आंतरराष्ट्रीय बहुमान (एमडीआरटी,अमेरिका)( मिलियन डॉलर राऊंड टेबल) मिळाल्याबद्दल जळकोट ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच अशोकराव पाटील, शिवसेना तालुका उपप्रमुख कृषणात मोरे, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र पाटील, बसवराज कवठे, तंटामुक्त समिती अध्यक्ष यशवंत कदम, राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय कदम, कृषीतज्ञ शिवाजीराव कदम, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती उपाध्यक्ष बबन मोरे, जिल्हा परिषद प्रशाला, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष शंकर वाडीकर, महेश कारले, दत्तात्रय चुंगे, सुरेंद्र मोरे, एसटी कर्मचारी राम भोगे, एसटी कर्मचारी हनुमंत कदम, सेक्रेटरी पोपट कदम, सुनील सुरवसे, जिल्हा परिषद मुलांची शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भैय्या किलजे, उपाध्यक्ष सिद्धनाथ सावंत ,जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष संतोष माळगे आदीसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मेघराज किलजे यांनी तर आभार प्रवीण गंगणे यांनी मानले.