नळदुर्ग , दि . २९  : 

नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हाद्दीतील जळकोट  ता. तुळजापूर येथे सोमवारी मध्यराञी अज्ञात चोरट्यानी एका घरातुन रोख रक्कमृसह सोन्या चांदीचे दागिने असे मिळुन पाऊण लाखाच्या मुद्दे  चोरुन नेल्याची घटना घडली आहे.याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


संभाजीनगर, जळकोट, ता. तुळजापूर येथील किरण ग्यानबा सगर यांच्या घराच्या जिन्यावरील उघड्या दरवाजातून दि. 27- 28.12.2021 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने प्रवेश करुन घरातील सोने- चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 73,500 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या किरण सगर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

 
Top