तुळजापूर , दि . १०


 श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवराञोत्सवास सोमवार   दि १० जानेवारी रोजी श्रीगणेश ओवरीत  संभळाचा कडकडाटात आई राजा उदो , उदोउदोचा गजर करीत  विधीवत घटस्थापना करुन  शाकंभरी नवराञोत्सवास  प्रारंभ  झाला.



श्री तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रेस्त मुर्ती पहाटे  सिंहासनावर प्रतिष्ठापित  करण्यात आली.
नंतर देवीजीस शुध्द स्नान  घालण्यात आल्यानंतर आरती, धुपारती करण्यात आली.  सकाळी सहा  वाजता  नित्याची पूजा  सुरु करण्यात आली.
यात सकाळी प्रथम यजमान प्रविण कदम यांची    शाकंभरी नवराञोत्सवातील  श्रीखंडाचा  सिंहासन पुजा करण्यात आल्यानंतर इतर यजमानांचा   सिंहासन पुजा करण्यात आल्या  त्या संपल्यानंतर श्रीदेवीजींची मुर्ती स्वछ करण्यात आल्यानंतर देवीजींना वस्ञोलंकार घालण्यात आले . नंतर सकाळी साडे अकरा वाजता विधीवत  घटकलशाचे पुजन श्रीगोमुख तिर्थकुंडा जवळ करण्यात आले. 

 हा घटकलश पारंपारिक वाद्यांचा गजारात वाजत गाजत मंदीरात आणण्यात आल्यानंतर   श्री  गणेश ओवरीत यजमान प्रविण कदम व त्यांच्या सौभाग्यवती मंजुषा  कदम ,  पाळीचे भोपे पुजारी प्रशांत संभाजीराव पाटील,  मंहत तुकोजीबुवा मंहत हमरोजी बुवा, मंहत वाकोजी बुवा , यांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली.यावेळी
धार्मिक व्यवस्थापक  नागेश शितोळे , सिध्देश्वर इंतुले , श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळ  अध्यक्ष  विपीन शिंदे , उपाध्यय  मडंळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, भोपे पुजारी  मंडळाचे सुधीर कदम , शशीकांत पाटील ,  सागर परमेश्वर, विकास मलबा ,  जगदीश पाटील , संकेत नागेश सांळुके, किशोर गंगणे, प्रा धनंजय लोंढे, संजय पेंदे, शांताराम पेंदे , कुमार इंगळेसह  सेवेदार    मंदीरचे कर्मचारी भक्त पुजारीवृंद अदि उपस्थितीत होते .


नंतर बृम्हवृदांना अनुष्ठानाची वर्णी देण्यात आली  नंतर शाकंभरी देववीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
 
Top