खामसवाडी दि.८ :
कळंब तालुक्यातील करंजकल्ला येथील जिल्हा परिषद प्रशालेची शालेय समितीची निवड
करण्यात आली. ही निवड पालक सभेमधून करण्यात आली. यावेळी शालेय व्यवस्थापन समीतीच्या अध्यक्षपदी विनोद वसंत पवार तर उपाध्यक्ष म्हणून सौ मीरा किरण पवार यांची निवड करण्यात आली. तसेच सदस्य म्हणून बालाजी गोरख शिंदे, अरुण पवार, सौ जयश्री संदीप पवार,आश्रुबा त्र्यंबक पवार, सौ नागीनी उबाळे, सौ वैशाली दादासाहेब झोंबाडे, विकास विनायक कवडे, अमोल अरविंद झोंबाडे यांची निवड करण्यात आली.तर शिक्षणतज्ञ म्हणून बापूराव जनार्दन पवार यांची निवड करण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश गायकवाड, बापूराव भंडारे, उपसरपंच विलास पवार ,पोलीस पाटील औदुंबर हिंगमिरे, बाबु बोंदरे, आखिल कुलकर्णी यांच्यासह पालक, शिक्षक उपस्थित होते.