वागदरी , दि . ११ : एस.के.गायकवाड 

वागदरी ता.तुळजापूर येते ग्राम पंचायत कार्यालयासमोरील मुख्य चौकात बसविण्यात आलेल्या हायमस्ट पथदिव्याचे लोकार्पण पंचायत समिती तुळजापूर च्या सभापती रेणुकाताई भिवा इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले आहे.


  पंचायत समिती तुळजापूरच्या सभापती रेणुका भिवा इंगोले यांच्या विकास निधीतून वागदरी येथे मारूती मंदिरा जवळ ग्रामपंचायत  कार्यालया  समोरील मुख्य चौकात बसविण्यात आलेल्या हायमस्ट पथदिव्याचे लोकार्पण नुकतेच प.स.सभापती रेणुका इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी ग्रामस्थाशी संवाद साधून गावातील समस्या जाणून घेतल्या व त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार,ग्रामसेवक जी.आर.जमादार,माजी सरपंच राजकुमार पवार, ह.भ.प.सुरेशसिंग परिहार, राजकुमार पाटील. ग्रा. प.सदस्य दत्ता सुरवसे, विद्या बिराजदार, भिवा इंगोले, रामचंद्र यादव,शशिकांत बिरादार,आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top