तुळजापूर , दि . २८
महावितरणच्या मनमानी व भोंगळ कारभाराबद्दल तुळजापूर शहरातील व्यापारी व नागरिकानी संताप व्यक्त करत याप्रकरणी महावितरणच्या वरिष्ठ आधिका-यानी लक्ष घालुन न्याय दयावे अन्यथा सामुहीकरित्या महावितरणच्या कारभाराबद्दल ग्राहकमंचात दाद मागावी लागेल असा इशारा तुळजापूर येथिल महावितरण विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांना तुळजापूर शहरातील नागरिक व व्यापाऱ्यानी व निवेदनाद्वारे दिला आहे.
तुळजापूर शहरातील घरगुती व वाणिज्य वीज ग्राहकांना मीटर रिडींग न घेता अवास्तव वीज बील देणे, व सक्तीची वीजबील वसुली करीत असल्याचे निवेदनात नमुद करुन गेल्या अनेक महिन्या पासून ग्राहकांचे वीज मीटर रिडींग घेतली नाही. दर महिन्याला अवास्तव वीज बील देण्यात येत आहे. मार्च एंडच्या नावाखाली सक्तीची वसुली केली जात आहे. महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत.
याचा जाबा विचारला असता नागरिकांना उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. संबधित वरिष्ठ अधिका-यानी दखल न घेतल्यास ग्राहक मंचामध्ये तक्रार धाव घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. यांची प्रत माहितीस्तव जिल्हाधिकारी व महावितरण विभागीय अभियंता यांना पाठविण्यात आले आहे.
या निवेदनावर मधुकर शेळके , अनंत बुरांडे ,श्रीकांत हिरळकर , नागेश गवते , अहमद पापा आता ,गणेश धोत्रे , संदीप तिकोणे , अविनाश नाईक, शिवलिंग साबळे ,चेतन पाटील ,अमरदीप तिकोणे , अमोल सरवदे ,दतात्रय पाटील , सुनिल हंडेकर , सार्थक मलबा , आकाश भालेकर , , नरसिंह ढेकणे ,अनिल डोकडे ,लक्ष्मीकांत सरवदे , गणेश तिकोणे , गौतम जमदाडे ,सागर तिकोणे , उमेश जाधव , महावीर मैंदर्गे आदी व्यापारी व नागरिकांच्या स्वाक्ष-या आहेत.