नळदुर्ग , दि . २८ 


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गेल्या दीड वर्षापासून स्वच्छ महाराष्ट्र अभियान अतंर्गत पहिला व दूसरा हप्ता मिळालेल्या लाभार्थ्याना नळदुर्ग  नगरपालिकेकडून प्रोत्साहनपर ३ हजार रुपये इतका तिसरा हप्ता वितरित करावा यासाठी नगरपालिकेकडे वारंवार निवेदने देऊन मागणी केली होती. 


यासाठी लेखी हमी मिळाल्याने मनसेने आंदोलन मागे घेतले होते. शिवाय मनसेच्या पदाधिका-यांनी यासाठी संबधित अधिका-यांशी सातत चर्चा करून या लाभार्थिना  तिसरा हप्ता द्यावा म्हणून पाठपुरावा करत होते,.अखेर त्याला यश आले असून शौचालय योजनेतील जवळपास १२००  लाभार्थी असलेल्या कुटुंबाना तीन हजार रुपयेचा हाप्ता मिळणार आहे. नगरपालिकेने तिसरा हपत्याचा  लाभ मिळविण्यासाठी, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, शौचालय बांधकाम पूर्ण झालेला फोटो आणि अर्ज लाभार्थिनी नगरपालिकेत द्यावेत अशी जाहिर सूचनाच काढल्याचे मनसेचे प्रमोद कुलकर्णी यांनी सांगितले . 


 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. हा प्रोत्साहनपर तिसरा हप्ता मिळवून देण्यासाठी नगरपालिकेकड़े जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांनी  पाठपुरावा केला.

 
Top