जळकोट, दि.७ : मेघराज किलजे

येथून जवळच असलेल्या जळकोटवाडी ( नळ) ता . तुळजापूर  येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना विरुद्ध काँग्रेस-भाजपा यांच्यात सरळ लढत होऊन, शिवसेनेचे सर्वच्या सर्व १२ उमेदवार निवडून आले. यामुळे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.


तुळजापूर तालुक्यातील  जळकोटवाडी ( नळ) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. दोन पॅनलमध्ये सरळ लढत झाली. यात शिवसेनेने सरपंच शिवाजी बाबुराव कदम यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल उभे केले होते. तर विरोधी काँग्रेस भाजपा एकत्र येऊन पॅनल उभे केले होते. यात शिवसेनेच्या पॅनलने बाजी मारली आहे. यात शिवसेना प्रणित पॅनलचे विजयी उमेदवार असे-वामन गुंडू कदम, शिवाजी श्रीमंत वागदरे, शिवाजी दादाराव कदम, नागनाथ मधुकर साळुंखे, प्रकाश मारुती कदम, गोरख लिंबाजी कदम, हनुमंत कृष्णा कदम, मच्छिंद्र धोंडीबा सुरवसे, बंकट रामा राठोड, फुलाबाई दिगंबर लष्करे, नंदाबाई सिद्राम साळुंके व नारायण दशरथ लोखंडे हे उमेदवार विजयी झाले. 


निकाल घोषित होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली. विजयी उमेदवारांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
 
Top