नळदुर्ग दि. ८

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची (पञकार दिन)  जयंती गुरुवारी उत्साहात साजरी करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी व सदस्य पत्रकारांचा विविध मान्यवराकडुन सन्मान पत्र, सन्मान चिन्ह, शाल, फेटा बांधुन व पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन व भेट वस्तु देवुन सन्मानित करण्यात आले.  


नळदुर्ग शहरातील  राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समिती, राणा प्रतिष्ठाण, जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा, नळदुर्ग शहर भारतीय जनता पार्टी, मैलारपूर कट्टा ग्रुप, अणदुर ता. तुळजापूर येथील जय मल्हार पत्रकार संघ, ऐतिहासिक भुईकोट किल्यात युनिटी मल्टीकॉन्स कंपनी, धरणे परिवार  आणि आरंभ सामाजिक संस्था  आदिंच्या वतीने नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे,  सचिव सुनिल गव्हाणे, . उपाध्यक्ष आयुब शेख, श्रीनिवास भोसले, कोषाध्यक्ष भगवंत सुरवसे, प्रसिद्धी प्रमुख शिवाजी नाईक, सदस्य जेष्ठ पत्रकार विलास येडगे, सुनिल बनसोडे, तानाजी जाधव,लतिफ शेख, उत्तम बनजगोळे,  दिनेश सलगरे , इरफान काझी, दादासाहेब बनसोडे, अजित चव्हाण, शोएब काझी, मुजम्मील शेख, किशोर नाईक, प्रा. पांडुरंग पोळे , विशाल डुकरे, पञकार  मिञ अमर भाळे आदिंचा गौरव करण्यात आला. 

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कारा प्रसंगी पद्माकर घोडके, ज्ञानेश्वर घोडके, मारुती घोडके, प्रभाकर घोडके, राणा प्रतिष्ठाणचे आधारस्तंभ बलदेव ठाकुर, आदिजण होते. 

जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आलुरे दत्तात्रय, सह शिक्षक सय्यद मोहीयोद्दीन, श्रीमती आलुरे ललीता, श्रीमती सुंदर भालकाटे, श्रीमती सुरेखा मोरे, श्रीमती चौधरी वंदना, आदिजण उपस्थित होते यावेळी सह शिक्षक बिलाल सौदागर यांनी सुत्रसंचलन व आभार मानले. 


नळदुर्ग शहर भाजप कार्यालयात शहराध्यक्ष धिमाजी घुगे, सुशांत भुमकर, श्रमिक पोतदार, पद्माकर घोडके, सागरसिंह हजारे, बबन चौधरी, अनंद लाटे, रियाज शेख, संभाजी कांबळे, मुदस्सर शेख, महेश घोडके, अविनाश दुबे आदीजन‍ उपस्थित होते. तर मैलारपुर कट्टा ग्रुपच्या वतीने श्री खंडोबा मंदीर येथे सत्कार प्रसंगी माजी नगरसेवक सुधिर हजारे, सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे, संजय विठ्ठल जाधव, जेष्ठ नागरिक रघुनाथ नागणे, संजय महाबोले, आदिजण उपस्थित होते. त्याचबरोबर धरणे परिवाराच्या वतीने सर्व पत्रकारांना भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक माजी बसवराज धरणे, ॲड. धनंजय धरणे, पृथ्वी केअर चे संस्थापक अध्यक्ष सचिन धरणे, आकाश धरणे, राहुल बेले, माजी नगरसेवक विनायक अहंकारी, भाजपचे माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके आदि उपस्थित होते.

आरंभ सामाजिक संस्थेच्यावतीने पञकाराचे सत्कार करण्यात आले. यावेळी आरंभ संस्थेचे राहुल हजारे , सागर हजारे , माजी नगरसेवक सुधीर हजारे आदि उपस्थित होते.
 
Top