जळकोट, दि.८ :
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील प्रयाग मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त जळकोट व परिसरातील पत्रकारांचा सोसायटी कार्यालयात सत्कार करण्यात आला.
प्रयाग मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. पत्रकार मेघराज किलजे, निजाम शेख, विरभद्र पिसे, अरुण लोखंडे, संजय रेणुके, संजय पिसे या पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटीचे मार्गदर्शक सुनील कदम, चेअरमन सचिन कदम, व्हाईस चेअरमन मनोज कदम, बालाजी माळी,शिवजन्मोत्सव समितीचे ब्रह्मानंद कदम, डॉ. संजय कदम, ताजुद्दीन शेख, मनोज राठोड, सगर, सोसायटीचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते.