काटी , दि . ८

तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव केंद्रांतर्गत सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील  शंभर टक्के  शिक्षकांची 'बालविवाह निर्मूलन संबंधी' ची कार्यशाळा जि प प्रशाला माळुंब्रा ता . तुळजापूर  याठिकाणी संपन्न झाली. सदरील कार्यशाळेचे आयोजन हे दिनांक 6 जानेवारी व 7 जानेवारी या दोन दिवशी करण्यात आले होते.


 पहिल्या दिवशी केंद्रातील  62 शिक्षक तर दुसऱ्या दिवशी 60  शिक्षक असे एकूण 122  शिक्षक कार्यशाळेसाठी उपस्थित होते. सदरील कार्यशाळेमध्ये शिक्षकांना बालविवाह निर्मूलन, बाल अधिकार, लैंगिक अपराध यांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012, विधिसंघर्षग्रस्त मुलं, काळजी व संरक्षणाची गरज, बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015,बाल संरक्षण समिती,बाल मजूर कामगार, बालविवाह प्रतिबंधक कायदा व जबाबदाऱ्या इत्यादी विषयांवर प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणासाठी गटशिक्षणाधिकारी  अर्जुन जाधव, केंद्रप्रमुख  राजेश धोंगडे,  शांताराम कुंभार,  गुणवंत चव्हाण,  कानडे , क्षीरसागर तुकाराम यांनी मार्गदर्शन केले. 

प्रशिक्षणासाठी भौतिक सुविधा व तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विभावरी गायकवाड यांचे सहकार्य लाभले.
 
Top