दाळिंब , दि . ११ :
उमरगा तालुक्यातील भुसणी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बालाजी संगसट्टे तर व्हाईस चेअरमनपदी दशरत मंडले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी बलभीम व्हनाजे तर उपाध्यक्षपदी युवराज मंडले यांचीही बिनविरोध निवड सोमवारी १० जानेवारी रोजी गांधी चौक, भुसणी येथे झाली. नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचा सत्कार बसव ब्रिगेड, अखिल भारतीय लिंगायत युवा मंच, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा उपाध्यक्ष भिमाशंकर व्हनाजे व भुसणी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य धनराज हिरमुखे, सरपंच महेश हिरमुखे, उपसरपंच प्रशांत गायकवाड, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीमंत पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र व्हनाजे आदींसह पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्यामध्ये चर्चा होऊन बिनविरोध निवड करण्यात आली. विविध कार्यकारी सोसायटी व जिल्हा परिषद शालेय समिती बिनविरोध काढल्याने गावात बिनविरोधाची परपंरा कायम ठेवण्यात सर्वांना यश आले.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार बसव ब्रिगेड, भुसणी शाखेचे अध्यक्ष बंडू व्हनाजे, अप्पा पाताळे, सतिश गायकवाड, अर्जुन व्हनाजे, सहदेव गुरव, सागर मंडले, काशिनाथ कडगंचे, शिवराज जमादार, किरण गाडेकर, वजीर मुल्ला, शंभुलिंग स्वामी, सचिन बिराजदार, कंन्टप्पा संगसट्टे, शिवशंकर स्वामी, सिध्देश्वर पाताळे, दिलीप व्हनाजे, अरुण व्हनाजे, सारंग सोनटक्के, ईरेश जामगे, गंगाधर व्हनाजे, राम सोनटक्के, लक्ष्मण कडगंचे, कुमार स्वामी, कार्तिक कडगंचे, महादेव व्हनाजे, उमाकांत बिराजदार, संजय बिराजदार आदी उपस्थित होते.