तुळजापूर , दि . ११

थोर समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जगप्रसिध्द आहे. सात भाषामध्ये त्याचा अनुवाद आहे . त्यांनी लोकनाट्य , कथा , नाटके कादंबऱ्या , चित्रपट , कथालेखन शेतकऱ्यांच्या  व्यथा याचे लेखन केले आहे .  समाजसुधारक व लेखक म्हणून ते प्रसिध्द आहेत . त्यामुळे त्यांचे नाव महापुरुषांच्या यादीत घेण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष जुबेर शेख यांनी मंगळवार  दि . ११  जानेवारी रोजी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे  केली आहे . 
 निवेदनात  पुढे नमुद केले आहे की , संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान आहे. असे असताना केंद्र सरकार यांनी महापुरुषांच्या यादीत त्यांचे नाव नोंद केले नाही . त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो . जे कोणी नाव समाविष्ट करण्यासपासून दूर ठेवत आहेत . त्यांच्याविरुध्द कठोर कायदेशीर कारवाई करावी व त्वरीत अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करावे . अन्यथा पुढील काळामध्ये लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल , असा इशारा जुबेर शेख दिला आहे. यावेळी तुळजापूर तालुकाध्यक्ष जुबेर शेख, राम थोरात, आंबादास वऱ्हाडे, हनुमंत मडोळे, युनूस सय्यद तसेच प्रहार सैनिक उपस्थित होते.
 
Top