नळदुर्ग , दि.११ :
 
मंगळवार  दि. ११ जानेवारी रोजी नळदुर्ग येथिल श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे (गोकुळ शुगर इंडस्ट्रीज)  बाॕयलर पूजन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण याच्या शुभहस्ते  करुन  अग्नी प्रज्वलित करण्यात आली. 

यावेळी गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे , जि.प. सदस्य बाबुराव चव्हाण , तुळजाभवानी कारखान्याचे  चेअरमन सुनीलराव  चव्हाण  यानी सहपत्निक होम हवन व सत्यनारायण पुजा केली .  यानंतर माजी मंत्री मधुकरराव चव्हाण याच्या हास्ते अग्नी प्रज्वलित करण्यात आले. या कार्यक्रमास उस्मानाबाद जनता बँकचे माजी  चेअरमन  ब्रिजलाल  मोदाणी ,  गोकुळ कारखान्याचे कार्यकारी संचालक कफिल शिंदे , संचालक कारतिक  पाटिल ,  युवा नेते आभिजीत चव्हाण , रणवीर चव्हाण , कार्यकारी संचालक विकास भोसले  यांच्यासह कारखान्याचे आधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.


श्री तुळजाभवानी साखर कारखान्याच्या कार्यक्षेञात सध्या ४ ते ५ लाख मे. टनापेक्षा आधिक ऊस  शिल्लक  आहे. येत्या दहा ते बारा दिवसात प्रत्यक्षात ऊस गाळपाच्या हंगामास सुरुवात होणार असल्याचे कार्यकारी संचालक विकास भोसले यानी बोलताना सांगितले .

तुळजापूर  तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू  असलेल्या नळदुर्ग येथिल  श्री तुळजाभवानी  शेतकरी सहकारी साखर कारखाना सन 2012 - 13 यावर्षीच्या गळीत हंगामापासून बंद आहे. त्यामुळे हा कारखाना कर्जाच्या खाईत लोटला गेला. कामगार व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी गैरसोय निर्माण होऊन प्रचंड हाल झाले. माजी मंञी मधुकरराव चव्हाण यानी सतत पाठपुरावा केला.

हा कारखाना दिर्घ कालावधीसाठी भाडेतत्वावर देण्याबाबत दि. 14 सप्टेंबर 2021 रोजी तुळजाभवानी कारखान्याचे आवसायक एस.पी. रोडगे यांनी जाहिरात प्रसिध्द केले. त्यानुसार के.डी. सोनवणे कंन्सट्रक्शन भोर पुणे, गोकुळ शुगर इंडस्ट्रिज धोत्री, कंचेश्वर शुगर लि. मंगरुळ, युवा कलेक्शन फर्म सोलापूर असे 4 टेंडर आले होते. दि. 29 सप्टेंबर रोजी  साखर  आयुक्त शेखर गायकवाड यांच्यापुढे टेंडर उघडुन हा कारखाना गोकुळ शुगर इंडस्ट्रीज याना भाडेतत्वावर देण्यात आले. 

लवकरच तुळजाभवानी कारखान्याचे गाळप हंगामास सुरुवात होणार असल्याने ऊस उत्पादक शेतकरी , सभासदातुन माजी मंञी मधुकरराव चव्हाण ,कारखान्याचे चेअरमन सुनिलराव चव्हाण यांचे आभिनंदन होत आहे.
 
Top