कळंब , दि . ९
कळंब तालुक्यातील हासेगाव केज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता ५ वी तील व आता इयत्ता 6 वी साठी जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर या ठिकाणी शिक्षण घेत असलेली कुमारी सृष्टी पांडुरंग तोडकर हिने शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती धारक झाल्याबद्दल तिचा सत्कार करताना डॉ. बाळकृष्ण भवर व स्काऊट गाईड कॅप्टन श्रीमती प्रतिभा गांगर्डे यांनी निवासस्थानी येऊन सत्कार केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप यादव यांनी केली तर आभार अशोक शिंपले यांनी केले. यावेळी ज्ञानेश्वर तोडकर, पांडुरंग तोडकर आदी उपस्थित होते.