नळदुर्ग , दि . २७ : 

शेतकरी व कामगार यांच्या हितासाठी श्री 
तुळजाभवानी साखर कारखाना सुरु केल्याबद्दल चेअरमन  सुनिल चव्हाण यांचा महाराष्ट्र  नवनिर्माण  सेनेच्या वतीने सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आले.


नळदुर्ग येथील तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना बऱ्याच वर्षापासून बंद अवस्थेत असल्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांना प्रचंड त्रास होत होता . कारखाना बंद असल्याने अनेक कामगारांच्या हाताला काम नव्हते, म्हणूनच श्री. तुळजाभवानी शेतकरी सहकरी साखर कारखान्याचे चेअरमन  सुनील चव्हाण यांनी प्रचंड मेहनत घेऊन स्वतः लक्ष घालून कारखाना भाड़ेतत्वावर चालवायला घेतला .आता कारखाना सुरु झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी,कामगार यांच्यात  आनंदाचे व उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे . कारखाना सुरु झाल्यामुळे जिल्हयातील शेतक-यांची दुभत्याची गाय समजली जाणार्‍या, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेलाही चांगले दिवस येणार आहेत . कारखाना सुरु करण्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन, तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांना न्याय दिल्याबदल, चेअरमन  सुनील चव्हाण यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे,जिल्हा सचिव ज्योतिबा, नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सचिव प्रमोद कुलकर्णी, मनविसे शहर सचिव आवेज इनामदार,संतोष राठोड़, तेजस भोगे यांनी हार,फेटा,शाल व श्री  तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा  दिल्या .
 
Top