नळदुर्ग , दि. २७ :
ऊस उत्पादक शेतकरी, कामगार ऊसतोड मजुर यांच्या हक्काचा श्री तुळजाभवानी साखर कारखाना आहे. शेतकऱ्यांनी योग्य भाव मिळण्यासाठी परिपक्व ऊस घालावे. त्यामुळे रिकव्हरी चांगली येईल, चांगला भाव मिळेल. असे सांगुन ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे वेळेवर पैसे द्यावे. त्याचबरोबर कारखान्याचे भाडे बँकेस वेळेवर भरावे. जेणेकरुन बँकेची नोटीस निघणार नाही. त्याकरिता कारखाना सुस्थितीत चालण्यासाठी व शेतकरी, कामगार यांच्या हितासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दि. 26 जानेवारी रोजी नळदुर्ग येथिल श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना संचलित गोकुळ शुगरच्या पहिल्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी गव्हाणीत ऊसाची मोळी टाकण्याच्या कार्यक्रमात केले.
बुधवार दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन तुळजाभवानी साखर कारखाना संचलित गोकुळ शुगर इंडस्ट्रीजच्या पहिल्या गळीत हंगामाचा थाटात शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी काट्याचे पुजन श्री शिवाचार्य महाराज, महंत श्री तुकोजी बुवा महाराज, महंत श्री मावजीनाथ बुवा महाराज, महंत श्री ईच्छागिरी बुवा महाराज, महंत व्यंकटारण्य बवा महाराज, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते पुजन करुन गव्हाणीत मोळी टाकण्यात आली.
यावेळी बोलताना माजी मंत्री मधुकरराव चव्हाण पुढे म्हणाले की, या भागातील शेतकऱ्यांची व कामगारांची समस्या सोडविण्यासाठी गेल्या वर्षभरापुर्वी पासून प्रयत्न सुरु होते. त्यास सर्वांचे सहकार्य लाभले. श्री तुळजाभवानी साखर कारखाना कर्जमुक्त व्हावा यासाठी गोकुळ शुगरने जास्त भाडे देवुन १५ वर्षाच्या भाडेतत्वावर चालविण्यासाठी घेतला आहे. शेतकरी , मजुर कामगार याना योग्य मोबदला मिळाला पाहिजे. पुर्वी ज्या चुका झाले ते यापुढे होणार नाही. याची खबरदारी घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर विरोधक असला तर त्याचा ऊस वाळू देणार नाही.त्याचेही गाळप केले जाणार आहे. असेही त्यानी सांगितले .
याप्रसंगी महंत महाराज यांनी कारखाना आता अडचणीतुन बाहेर पडला असुन हा कारखाना बंद होणार नाही. चेअरमन सुनिल चव्हाण व दत्ता शिंदे ही जोडी श्री तुळजाभवानी कारखान्यास गतवैभव मिळवुन देणार असुन शेतकरी , कामगार यांच्या अडी अडचणी सुटतील असा आर्शीवाद दिला.
या कार्यक्रमास तुळजाभवानी कारखान्याचे चेअरमन सुनिल चव्हाण, गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे, जि.प. सदस्य बाबुराव चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ शिदे, जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच रामचंद्र आलुरे, बालाघाट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष उल्हास बोरगावकर, कारखान्याचे संस्थापक संचालक अशोक मगर, अख्तर काझी, कपिल शिंदे , माजी जि.प. सदस्य मुकूंद डोंगरे, पंडित जोकार , काँग्रेस महिला तालुका अध्यक्षा सुभद्रा मुळे, नळदुर्ग शहर महिला अध्यक्षा कल्पना गायकवाड, माजी सरपंच सरिता मोकाशे , माजी नगरसेवक बसवराज धरणे, विनायक अंहकारी , शहबाज काझी , इमाम शेख , सोसायटीचे चेअरमन सुरेश हजारे , सामाजिक कार्यकर्ते सुनिल बनसोडे , बालाजी मोकाशे, सरपंच अशोक पाटील , मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे , सिद्राम मुळे , कृष्णात मोरे , रणवीर चव्हाण , आभिजित चव्हाण , अझर जहागिरदार , महंत वसंत रामदासी , अमर नरवडे , संगाप्पा हागलगुंडे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प. सदस्य बाबुराव चव्हाण यानी केले. सुत्रसंचालन माजी नगरसेवक विनायक अंहकारी तर आभार कार्यकारी संचालक विकास भोसले यानी मानले.
दत्ता शिंदे , चेअरमन गोकुळ शुगर
गोकुळ शुगरच्या वाटाचालीत तुळजापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा योगदान आहे. त्यामुळे चांगली रिकव्हरी मिळाल्याने चांगले भाव यापुर्वी दिले आहे. या कारखाना कार्यक्षेञातील शेतक-याना ऊसाचे बील व कामगाराना वेतन वेळेवर दिले जाईल. त्याचबरोबर माजी मंञी मधुकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल चव्हाण व इतर जेष्ठाच्या सहकार्याने तुळजाभवानी साखर कारखाना संचलित गोकुळ शुगर या कारखान्यास आधुनिकतेची झालर देवुन निश्चितच या कारखान्यास गतवैभव मिळवुन देण्यास प्रयत्नशिल आहे, असे सांगितले.